सरपंच सेवासंघातर्फे आमदार कोरोटे व उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर

ग्रा.पं.स्तरावरील कापलेले पथदिवेचे विज बिल भरना करुण विज कनेक्शन पुन्हा जोड़नी बाबदची मागणी

देवरी २६: विज वितरण कंपनी द्वारे ग्रामपंचायत स्तरावर नुकतेच कापलेले पथदिवेचे विज कनेक्शन चे विज बिल शासन किंवा जिल्हा परिषद स्तरावर भरणा करुण द्यावी या मागणी विषयी देवरी तालुका सरपंच सेवा संघा तर्फे शुक्रवारी(ता.२५ जून) रोजी आमदार सहषराम कोरोटे आणि विज वितरण कंपनी देवरीचे उप कार्यकारी अभियंता सरोज परिहार यांना भेटून या विषयी सविस्तर चर्चा करुण निवेदन सादर करन्यात आले.

सादर केलेल्या निवेदनात सरपंच सेवा संघाने म्हटले आहे की, देवरी तालुक्यातील सर्व ग्रा.पं.च्या गावातील पथदीवेचे विज कनेक्शन विज वितरण कंपनीने कापले आहे. त्यामुळे गावातील सर्व लोकांचा रोष हा सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं.सदस्यावर आहे. या विषयी हे लोक आम्हाला शिविगाळ देवुन गावात असंतोष निर्माण करित आहेत. अगोदर पासून विज वितरण कंपनीचे ग्रा.पं.स्तरावर विज जोड़नी बाबद चा करार हा गोंदिया जि.प. यांच्याशी झाला आहे.
यात फक्त मेंटेनेंस करण्याची जबाबदारी ही ग्राम पंचायत कड़े आहे. आजच्या तारखेत तालुक्यातील प्रत्येक ग्रा.पं.ला विज वितरण कंपनीचे जवळपास दोन ते पाँच लाखापर्यतचे विज बिल भरण्याचे मागणी पत्र प्राप्त झाले आहे. यात जर सुरूवातीपासून विज बिल भरण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायत ला दिली असती तर ऐवढा खर्च(वोझा) ग्रा.पं. वर पडला नसता. आता सध्या कोरोना संसर्ग काळात ग्रा.पं.ने कोणत्या फंडातुन विज बिलाची भरना करावी ऐवढी मोठी रक्कम कुठून आणावे हेच कळत नाही.
तरी शासनाच्या सर्व लोकप्रतिनिधि आपन व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी विज बिलाच्या भरना विषयी पुढाकार घेवून पाठपुरावा करुण शासन किंवा जिल्हा परिषद स्तरावर करुण ग्रा.पं.चे विज बिलाची भरना करुण देण्याकरिता प्रयत्न करावे अशी मागणी सरपंच सेवा संघ देवरी तालुका तर्फे करन्यात आली आहे.

जर या विषयी त्वरित निर्णय न झाल्यास या मागणीला धरून तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंच सरपंच सेवा संघाच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करेल अशा इशारा ही निवेदनातून देण्यात आले आहे.

निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात सरपंच सेवा संघ देवरी तालुक्याचे अध्यक्ष तथा फुक्कीमेटा चे सरपंच विनोद भेंडारकर, सचिव तथा पलानगावचे सरपंच संजय राऊत, मुल्लाचे सरपंच कृपासागर गोपाले, आमगांव चे सरपंच रेखा तरोने, गोटाबोडी चे सरपंच मनोहर राउत, सिरपुर/बांध चे सरपंच नितेश भेण्डारकर, सर्रेगाव/घोनाडीचे सरपंच सोनू नेताम, पिपरखारी चे सरपंच धनश्री गंगासागर, शिलापुर चे सरपंच गरीबा टेम्भूरकर, शेरपार चे सरपंच गुणवंता कवास, वांढराचे सरपंच मीराबाई कुंजाम, चिचगडचे सरपंच कल्पना गोस्वामी, शेडेपार चे सरपंच माधुरीताई राउत, केशोरी चे सरपंच भारती सलामे, चिचेवाड़ा चे सरपंच शामकला गावळ यांच्यासह तालुक्यातील अनेक सरपंच व उपसरपंचचा यात समावेश होता.

Print Friendly, PDF & Email
Share