पोलीस विभाग व अदानी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने युवक-युवतींसाठी पोलिस /सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम

पोलीस विभाग गोंदिया व अदानी फाउंडेशन,तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन यादव तसेच अदानी पावर प्रमुख कांती बीश्वास यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी मोफत पोलिस/ सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम गेल्या दोन वर्षापासून चालविल्या जात आहे.


या कार्यक्रमांतर्गत पोलीस विभागाने नेमून दिलेल्या प्रशिक्षकांमार्फत सकाळी 7 ते 10 या वेळामध्ये मैदानी सराव करून घेतल्या जातो नंतर 10 ते 12 या वेळामध्ये लेखी परीक्षेची तयारी करून घेतल्या जाते. आतापर्यंत या प्रशिक्षणा मार्फत 13 विद्यार्थ्यांची सैन्यामध्ये निवड झालेली आहे. या कार्यक्रमाचा उद्देश जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींची पोलीस व सैन्यामध्ये निवड व्हावी हा असून जास्तीत जास्त युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन अदानी फाउंडेशन प्रमुख नितीन शिराळकर यांनी केले प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अदानी फाउंडेशन चे कार्यक्रम अधिकारी राहुल शेजव तसेच प्रशिक्षक वशिम खान ,प्रशांत कावळे, सचिन बिसेन यांच्याशी संपर्क साधावा

Print Friendly, PDF & Email
Share