राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिन साजरा

देवरी 26: शिवसेना कार्यालय देवरी येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला.या प्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक करुणा कुर्वे आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या तैलचित्रासमोर कार्यक्रमास उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करुन माल्यार्पण करण्यात आले.

शिवसेना महिला आघाडी जिल्हा कार्यालय देवरी येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी कोरोना योद्धा पुष्पा धुर्वे अधिसेविका यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

Print Friendly, PDF & Email
Share