आधुनिक तंत्रज्ञानामुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळेल – विष्णूजी साळवे

देवरी 27: भात शेती मधील विविध आव्हान पाहता पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी कमी खर्चाचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे धान शेतीला नवसंजीवनी मिळेल असे प्रतिपादन कृषी उपसंचालक पुणे तथा गोंदिया जिल्ह्याचे पालक संचालक विष्णुजी साळवे यांनी केले. ते देवरी तालुक्यातील निलज या गावी कृषी संजीवनी सप्ताहाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक उमाजी घरत तसेच केशव घरत, सावंत राऊत,सलामे व बहुसंख्येने महिला शेतकरी उपस्थित होते.
विष्णूची साळवे हे कृषी आयुक्तालय पुणे येथील कृषी उपसंचालक (कृषि यांत्रिकीकरण अभियान) म्हणून कार्यरत आहेत.

देवरी तालुक्यामध्ये दिनांक 21 जून ते 1 जुलै 2019 पर्यंत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सदर कृषि संजीवनी सप्ताहाचे निरीक्षक म्हणून गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले विष्णू साळवे साहेब देवरी तालुक्यातील निलज येथे महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. सदर मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी देवरीचे उपविभागीय कृषि अधिकारी मंगेश वावधने, तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी, विकास कुंभारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पारंपरिक भात शेती केल्याने धान शेती अत्यंत खर्चिक होऊन आर्थिकदृष्ट्या तोट्याची झालेली आहे. पारंपरिक शेतीमध्ये धानाची बियाणे फोकून पेरणी केली जाते. त्यामुळे कमी जागेत अनियंत्रित व असंख्य रोपे तयार होऊन रोपांची संख्या अमर्याद राहते .पर्यायाने सूर्यप्रकाश हवा खेळती राहत नसल्याने शत्रुकीडींच्या विविध आवस्था अंडी, अळी, कोष, पतंग हे जीवनक्रम सोयीस्कर रित्या पूर्ण करतात. त्यामुळे हातातोंडाशी आलेले भाताचे पीकाला मावा, तुडतुडे, खोडकिडी, लष्करी अळी, इत्यादी कीडी प्रचंड नुकसान करतात. भाताचे पिक हे आर्थिक नुकसानीच्या (ETL) पातळीच्या वर जाते. यामुळे शेतीसाठी बियाणे खरेदी, रासायनिक खते, निविष्ठा खरेदी, पाणी व्यवस्थापन , कीडी व रोगावरील उपाय करण्यासाठी करण्यात येणारा उत्पादन खर्च वाढत चालले आहे. उत्पादन खर्च आतोनात झाल्याने भात शेती मधील नफा-तोटा गुणोत्तर निराशजनक येऊन शेतकऱ्यांमध्ये शेती व्यवसाय बद्दल नाराजी पसरत आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधाण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार कृषी संजीवनी सप्ताह मोहीम स्वरूपामध्ये राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांमध्ये विविध कमी खर्चाचे तंत्रज्ञान सुधारित व नियंत्रित भात लागवड चारसूत्री पद्धती, श्री पद्धती, पट्टा पद्धतीने लागवड तंत्रज्ञान, आपत्कालीन परिस्थितीमध्ये ड्रम सीडर पेरणी यंत्राचा वापर ,जैविक पद्धतीने कीटकनाशक तयार करण्याचे शेतकऱ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे.
कृषी संजीवनी सप्ताहाच्या चौथ्या दिवशी सुधारित भात लागवड तंत्रज्ञान या प्रमुख विषयावर प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी कृषी विभागाचे पथक निलज येथील प्रगतिशील शेतकरी केशव घरत यांच्या प्रांगणात विविध बाबींचे छोटेखानी प्रदर्शन दाखवण्यात आले. तसेच या प्रदर्शनीमध्ये चारसूत्री पद्धत, श्री पद्धत, युरिया ब्रिकेट्स इंजेक्टर,अँझोला संवर्धन, निंबोळी अर्क तयार करणे, दशपर्णी अर्क तयार करणे, मनुष्य चलीत ड्रम सीडर पेरणी यंत्र इत्यादी प्रात्यक्षिके मांडण्यात आले होते. निलजचे कृषिसहाय्यिका सौ. दिपकला गौतम,सौ.माया येरणे, सौ. ललिता धानगाये यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. तसेच सदर प्रदर्शनाचे उत्कृष्ट मांडणी व सादरीकरण केल्याबद्दल कृषी उपसंचालक माननीय साळवे साहेब यांनी वरील कृषी सहाय्यिका यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.

कृषी संजीवनी सप्ताहामध्ये क्षेत्रीय पातळीवरील उल्लेखनीय कार्य होत असल्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी कृषिपर्यवेक्षक जी. एस पांडे, शिवकुमारी येडाम, मनोहर जमदाल,गिरीजाशंकर कोरे ,सचिन गावळ,हुडे, सखी महीला मंच, मावि मंडळचे महिलां सदस्यां यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेन्द्र पारधी यांनी तर आभार प्रदर्शन चंद्रकांत कोळी यांनी केले…

Print Friendly, PDF & Email
Share