
देवरी येथे बर्निंग कार चा थरार! शिरपूर चेकपोस्ट वरील घटना
देवरी: शिरपुर/बांध सीमा तपासणी नाक्यावर पहाटे ५:२५ वाजण्याच्या सुमारास द बर्निंग कारचा थरार गावकऱ्यांनी अनुभवला. नागपूर वरुन झारखंड ला जाताना अचानक कार पेटल्याने मोठे नुकसान झाले आहे. अग्रिशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले मात्र ती पर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क.५३ वरील देवरी पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम शिरपूर असलेल्या सीमा तपासणी नाक्यावर दि.१० एप्रिल २०२५ ला पाच व्यक्ती आपल्या डस्टर गाडीने नागपूर वरुन झारखंडला काही कामानिमित जात असताना, शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत कार जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले मात्र आगीया मोठा भडका असल्यामुळे कोणीही जवळ जाऊ शकले नाही. गावकऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. अवघ्या काही मिनीटातच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविले मात्र तो पर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली. यामध्ये सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.