
व्हिडीओ निर्मिती स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात
देवरी – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया द्वारा आयोजित शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ चा तालुकास्तरीय बक्षीस वितरण समारंभ गट साधन केंद्र पंचायत समिती देवरी येथे दिनांक 11.04.25 रोजी पार पडला.यात एकूण 30 शिक्षकांना बक्षीस म्हणून प्रविण्यानुसार एकूण चार गटात विषयनिहाय रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रमुख अतिथी यांचे हस्ते देण्यात आले.
बक्षिस वितरण कार्यक्रमाचे संचालन मुनेश्वर टेंभूर्णे सहाय्यक शिक्षक जि प व प्रा शाळा देवरी यांनी केले सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून अनिल बिसेन सभापती पंचायत समिती देवरी उपस्थीत होते तसेच प्रमुख पाहुणे जि टी शिंगणजुळे गट विकास अधिकारी पंचायत समिती देवरी, महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देवरी, एच जी राऊत शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती देवरी, लाडे सर केंद्रप्रमुख डोंगरगाव उपस्थित होते. सदर कार्यक्रमास मा. केंद्रप्रमुख, विषय साधनव्यक्ती, तालुका समन्वयक IED, विशेष शिक्षक, सहाय्यक शिक्षक यांचे सहकार्य लाभले शेवटी कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार धनवंत कावळे गट समन्वयक यांनी मानले.