
देवरी चेकपोस्टवर आरटीओ अडकला एसीबी च्या जाळ्यात
देवरी: महाराष्ट्रात वसुलीसाठी प्रसिद्ध देवरी आरटीओ चेकपोस्ट वर एसीबीने सापळा रचून येथे कार्यरत सहायक आरटीओ योगेश खैरनाग याला अवैद्यरित्या वसुली करतांना रंगेहाथ पकडले असून नाशिक येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याची घटना आज 11 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान घडली.मिळालेल्या माहितीनुसार देवरी चेकपोस्टवर अवैधरित्या वाहनचालकाकडून वसुली केली जात असल्याची तक्रार वाहनचालकांनी केलेली होती,त्यानुसार एका ट्रेलरच्या वाहनचालकाला आपल्या वाहनात बसवून नाशिक एसीबीचे अधिकारी ट्रेलरचे वाहनचालक (MH-46) म्हणून चढले आणि चेकपोस्टवर पोचताच त्यांना पैशाची मागणी झाली असता पैसे भरण्याकरीता कार्यालयातील खिडकीजवळ असलेल्या काऊंटरवर जाऊन पैसे देत असताना कारवाई करण्यात आल्याचे माहिती आहे. सहा.परिवहन अधिकारी योगेश खैरनार यांच्यासोबत इतर दोघांनाही सुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
सविस्तर माहिती लवकरच