
अवैद्य वाहन पार्किंगवर नियंत्रण कुणाचे ? देवरीत आपले स्वागत आहे वाट्टेल तिथे अवजड वाहन उभे करा ?
देवरी १२: राज्यात गेल्या सहा महिन्यांत गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघात संख्या सुमारे 25 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अपघातांसह त्यात मृत्यू पावणार्या प्रवाशांचा आकडा तब्बल 28 टक्क्यांनी वाढला आहे.
देवरी शहरातील आमगाव रोड परिसरात अवजड वाहनाच्या पार्किंगवर नियंत्रण कुणाचे अशे प्रश्न देवरिवाशीयांना पडला आहे. अवजड वाहने चक्क शाळा , बँक , रहदारीच्या मार्गावर , त्रिमूत्री नगर बस थांब्याच्या दोन्ही बाजूला उभे करून वाहन चालक रहदारीस अडथळा निर्माण करीत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवरी शहरातून महामार्ग 6 (मुंबई ते कोलकाता) गेलेला असून RTO चेक पोस्ट असल्याने मोठ्या प्रमाणात जळवाहनांची वरदळ असते. बाजारपेठ , शाळा , महाविद्यालये सुरु झाली त्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणात विद्यार्थी , मजूर , कामगार आणि नागरिक शहरात हजेरी लावत आहेत. शहरातुन मधोमध गेलेल्या महामार्गवर उभे असलेल्या जळवाहनांमुळे येणारे जाणारे वाहन दिसत नसल्यामुळे जिव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

प्रामुख्याने बस स्टाप, चिचगड चौक, अग्रसेनचौक, पोस्टऑफ़िस, बैंक ओफ बदोडा, स्टेटबैंक, बैंक ओफ इंडिया कनेरा बैंक, पंचायतसमिती, तहसीलकार्यालय, शाळा महाविद्यालये , नगरपंचायत परिसरात सर्वात जास्त अनियंत्रित वाहतूतिचे चित्र बघावयास मिळते.
बाजारपेठे, बँक, शासकीय कार्यालयात गर्दीमुळे रस्त्यावरील ट्राफिक वाढली :
बँक, पोस्ट ऑफिस , तहसील कार्यालये महामार्गावर असल्यामुळे याठिकाणी नेहमीच मोठीगर्दी असते. त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या अपघातापासून जिव वाचविण्यासाठी स्वतःची काळजी स्वतः घेणे हाच एकमेव उपाय शिल्लक आहे.
शालेय विद्यार्थी संकटात, पालकांची चिंता वाढली :
देवरी येथे हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येतात शाळा, महाविद्यालये सुरु झालेले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये य दृष्टीने पालक आपल्या पाल्यांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठविण्यास उत्सुक आहेत. परंतु देवरी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा रस्ता दुभाजकाला लागूनच मोठे जळ वाहने उभी केली जात असल्याचे स्पष्ट चित्र असून महामार्ग ओलांडताना येणारे जाणारे वाहन अजिबात दिसत नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.
राज्यात सर्वाधिक अपघात मुंबई मध्ये झालेले असून अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू नाशिककरांचे झाले आहेत. परिणामी, राज्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत अपघातांच्या संख्येत सुमारे 25 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.