‘सौ. लालन विठ्ठलसिंग राजपूत’ यांनी स्वीकारला देवरी तालुका कृषी अधिकारी चा पदभार

प्रहार टाईम्स

देवरी 08: भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश लोकसंख्या कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. गोंदिया जिल्हातील देवरी तालुक्यातील जास्तीत जास्त लोकसंख्या आदिवासी ग्रामीण भागातील असून कृषी व्यवसायावर अवलंबून आहेत. कृषी क्षेत्रात या विभागाची महत्वाची भूमिका आहे. नुकतेच याआधीचे कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम सेवानिवृत्त झाले असून त्यांचे पद रिक्त झाले होते.

तालुका कृषी अधिकारी सेवानिवृत्त झाल्यामुळे सौ. लालन विठ्ठलसिंग राजपूत यांनी नुकताच कृषी अधिकारी चा पदभार स्वीकारला असून विभागातील मंडळ अधिकारी , कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा अभिनंदन करून कृषी अधिकारी कार्यालयात स्वागत केला आहे.

Share