देवरी तालुक्यात 15 ते 18 वयोगटातील 195 मुलांनी पहिल्या दिवशी करून घेतला लसीकरण
देवरी 03:. सुमारे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर 3 जानेवारी 2022 पासून देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांचंही कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांत देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचं संकट उंबरठ्यावर उभं असल्याचं दिसून येतं. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाच्या निर्णयाला अधिकच महत्त्व प्राप्त होत असल्याचं दिसून येतं.
त्या अंतर्गत 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्यात आले. यामध्ये देवरी तालुक्यातील 195 मुलांनी लसीकरणाचा लाभ घेतला असून ककोडी PHC येथे सर्वाधिक -169 ,मुल्ला PHC -16,ग्रामीण रुग्णालय देवरी -10 असे ऐकून 195 मुला व मुलीचे लसीकरण झाले आहे. जास्तीत जास्त मुलामुलींचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
10 जानेवारी 2022 पासून आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीतील कर्मचारी तसंच 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लशीचा बूस्टर डोस (तिसरा डोस) देण्यात येणार आहे. 15 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचं लसीकरण करत असताना केवळ भारत बायोटेक या कंपनीने बनवलेली कोव्हॅक्सीन हीच लस त्यांना देण्यात येईल.
लस मिळवण्यासाठी 15 पेक्षा अधिक वयाच्या मुलांनी आधीच्याच Co-Win वेबसाईटवर रजिस्टर करायचं आहे.2007 किंवा त्यापेक्षा आधी जन्म झालेल्या किशोरवयीन मुला-मुलींना याचा लाभ घेता येईल. त्यासाठी Co-Win वेबसाईटवर आधीपासून वापरलेल्या किंवा नव्या मोबाईल नंबरचा वापर केला जाऊ शकतो. ज्यांना शक्य नाही, ते व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करू शकतात.