राज्यातील 4 हजार पोलिसांचे मुख्यमंत्र्यांना ई-मेल, सरकारबाबत नाराजी..!

Mumbai: राज्यातील पोलिस दलातून मोठी बातमी समोर येतेय. गेल्या 5 वर्षांपासून पोलिस खात्यांतर्गत उपनिरीक्षक पदाची परीक्षा न झाल्याने पोलिस शिपाई व अंमलदारांचे पोलिस उपनिरीक्षक पदाचे स्वप्न अपूर्ण राहिलंय. त्यात राज्य सरकारने थेट बाहेरून पोलिस अधिकाऱ्यांच्या जागा भरण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीय.

ठाकरे सरकारने 2016 मधील ‘एमपीएससी’ परीक्षेतील अतिरिक्त 636 उमेदवारांना थेट पोलिस उपनिरीक्षक पदावर सामावून घेण्याचा निर्णय घेतलाय. सरकारच्या या निर्णयामुळे पोलिस दलातील खदखद बाहेर आलीय.

चार हजार कर्मचाऱ्यांचे मेल:
राज्यातील सुमारे 4 हजार पोलिस शिपाई व अंमलदारांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना ई-मेल पाठविले आहेत.. त्यात या पोलिसांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत.

अतिरिक्त 636 उमेदवारांना पोलिस उपनिरीक्षक पदावर सामावून घेण्याचा निर्णय घेतला, तसाच खात्यांतर्गत परीक्षा देणाऱ्या 2200 उमेदवारांनाही सामावून घेण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी ई-मेलद्वारे केली आहे.

Share