देशाच्या किर्तीत शालेय खेळांचा मोलाचा वाटा : एपीआय आनंदराव घाडगे

🔺ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे क्रिडा सत्राचे थाटात उद्घाघाटन

देवरी: ब्लॉसम स्कुल येथे 15 व्या वार्षिक क्रीडा सत्राचे थाटात उदघाटन करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नक्षल सेल चे सहा. पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे , प्राचार्य डॉ सुजित टेटे , क्रीडा शिक्षक राहुल मोहुर्ले आणि अजित टेटे मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात स्वागत समारंभ आणि फीत कापून करण्यात आली.

देशाच्या किर्तीत शालेय खेळांचा मोलाचा वाटा असून त्यामध्ये आपले करिअर करता येते. शालेय जीवनातील खेळाचे महत्व आणि खेळामुळे पोलीस विभागातील अधिकारी पदावर कसे पोहचता येते या विषयावर एपीआय आनंदराव घाडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्राचार्य सुजित टेटे यांनी खेळातील विजय आणि पराजय या दोन्ही नाण्याच्या बाजू आहेत त्यामुळे खचू नका पुन्हा प्रयत्न करा असे मत व्यक्त केले.


सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मोहुरले, विश्वप्रीत निकोडे यांनी केले आभार प्रदर्शन नितेश लाडे यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावली.

Print Friendly, PDF & Email
Share