डॉ. बारसागडे विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित
■ नागपूर येथे विद्याभूषण फाऊंडेशनच्या वतीने या पुरस्काराचे वितरण.
देवरी,ता.०५: नागपूर येथील ऊरवेला कालोनी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनातील सभागृहात विद्याभूषण फाऊंडेशन,नागपूरच्या वतीने शनीवार रोजी आयोजित विदर्भ भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात देवरी तालुक्यातील बोरगावं/बाजार येथील एकलव्य माडेल रेसिडेन्सीयल पब्लिक स्कुल तथाशासकिय माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य आणि जागतीक सामाजिक संस्था रोटरी क्लब पश्चिम नागपूर चे सदस्य डॉ. जगदीश बारसागडे यांना विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विद्याभूषण फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणा-या विदर्भ भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त रविन्द्र ठाकरे यांच्या हस्ते आणि जागतीक बँकेचे माजी सल्लागार डॉ. रमेश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी इंदिरा गांधी राष्ट्रीयमुक्त विद्यापीठनागपूरचे संचालक डॉ. पी.शिवस्वरूप, नगरविकास विभागाचे उपायुक्त संघमित्रा ढोके,डॉ. अनिल शर्मा व प्रा.प्रतापसिंग चौव्हाण आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी डॉ. जगदीश बारसागडे यांच्यासोबत केनियाचे डॉ. दीपक हेडा,लंडनच्या डॉ. प्रियंका पाटील यांच्यासह इतर २८ मान्यवरांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दरम्यान डॉ. भूषण भस्मे यांनी संस्थेची भूमिका विशद केली.तर मंच संचालन संस्थेचे रंगराज गोस्वामी यांनी आणि उपस्थितांचे आभार पूजा भस्मे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता रमेश चहारे, दिलीप रंगारी, विजय कोल्हे, अमित भस्मे, नूपुर भस्मे, नीलिमा चहारे, राजश्री बागडे, रोशनी वैरागडे, बिंदू वासनिक, पुष्पा शेंडे, कल्पना गायकवाड आदिंनी सहकार्य केले.
विदर्भ भूषण पुरस्काराने डॉ. जगदीश बारसागडे यांचा सन्मान झाल्याबद्दल आदिवासी विकास विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी,सदस्यगण आणि मित्रमंडळी व नातेवाईक हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.