वापरायोग्य नसलेल्या 51.71 कोटी रुपयाच्या मुद्रांकाचे निर्लेखन
गोंदिया: गोंदिया जिल्हा कोषागार कार्यालयातील वापरायोग्य नसलेल्या 51 कोटी 71 लक्ष 95 हजार 140 रुपये किमतीच्या मुद्रांकाचे शासकीय नियमानुसार निर्लेखन करण्यात आले. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तसेच नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्या आदेशान्वये जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधिनस्त सुरक्षा कक्षातील शिल्लक असलेल्या परंतु वापरायोग्य नसलेल्या मुद्रांकांचे निर्लेखनाचे जिल्हा मुद्रांक निर्लेखन समिती समक्ष करण्यात आले.
या मुद्राकांची किमती 51 कोटी 71 लक्ष 95 हजार 140 रुपये इतकी आहे. यावेळी सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी के. एस. कांबळे, कोषागार अधिकारी चं. रा. आंबोळे, अप्पर कोषागार अधिकारी नि. ल. पदमेरे तसेच कोषागार कार्यालयातील कर्मचार्यांनी मुद्रांकाची मोजणी करुन त्यांची बारीक बारीक तुकडे करुन मुद्रांक निर्लेखनाची कार्यवाही योग्यरित्या पार पाडली. वापरयोग्य नसलेले मुद्रांक नष्ठीकरण्याची कार्यवाही नियमानुसार करण्यात आली असल्याचे कोषागार अधिकारी चं. रा. आंबोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.