कृषीकन्यांनी सांगितला खतांचा वापर करण्याचा नवीन मार्ग

◼️कृषी क्षेत्रातील खतांच्या वापरावर विद्यार्थिनींचा मार्गदर्शन

गोंदिया ◼️ भारत हा कृषीप्रदान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था शेती व्यवसायावर अवलंबून आहे. कृषी क्षेत्रातील नवनवीन उपक्रमाद्वारे शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होते यानिमित्ताने मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील कृषी कन्यांनी रावे ग्रामिण कृषी कार्यानुभव उपक्रम अंतर्गत ग्राम आसोली येथील शेतकरी बांधवाना खते टाकण्याची योग्य पद्धत कळावी व योग्य प्रमाणात खतांचा वापर केला तर शेतकऱ्यांना अधिक उत्पादन कसे घेता येईल याबददल मार्गदर्शन केले. सदर उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रतिक्षा चहांदकर, निलिमा चिडे, रक्षा ढबाले, सृष्टी फूलझेले व स्नेहल गडकरी या विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

सदर उपक्रमाला प्राचार्य डॉ एस.सी. अवताडे, रावे प्रमुख आर. आर. कोवे, कार्यक्रम अधिकारी के. आर. चौहान तसेच के. के. किरसान व व्हि. वा. ब्राम्हणकर यांचे मार्गदर्शन लाभले असून अतिशय उत्तमरित्या हा उपक्रम राबविण्यात आला.

Share