देवरी शहर सर्वधर्म समभाव व शांततेचे प्रतिक : प्रवीण डांगे पोलीस निरीक्षक

देवरी शहरात आणि तालुक्यात जवळपास सर्वच समाजातील, धर्मातील तथा पंथातील बंधू – भगिनी वसलेले असून प्रत्येक जण, प्रत्येक समाज आपापल्या परंपरेने आपापले सण साजरे करीत आहेत. तर, काही सण तथा उत्सव पण सामुहिक रितीने करुन आपसात भांडण – तंट्टे न करता साजरे करीत आहेत. त्यामुळे, स्थानिक कुणाचीही सामुहिक गुन्ह्याची पोलिस स्टेशनमध्ये तक्रारीची नोंद नाही. यामुळे, देवरी शहर आणि तालुका हे सर्वधर्म समभावसाठी शांततेचा प्रतिक आहे. पुढे भविष्यात पण असंच सुव्यवस्थित गोडगुलाबीचे आपसात वातावरण राहील, असं समजायला हरकत नाही. असे प्रतिपादन देवरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण डांगे यांनी केले.
देवरी येथील सुप्रसिध्द मॉ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिर समिती तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण आयोजीत पोळा आणि तान्हा पोळा कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण सोहळ्यात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, महामंत्री अनिल येरणे, दक्षिण समाज प्रमुख यादवराव पंचमवार, नगराध्यक्ष संजू उईके, भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण दहीकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप भाटीया, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष छोटेलाल बिसेन, मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार, उपाध्यक्ष कुवरलाल भेलावे, सचिव सुशील शेंद्रे, भय्यालाल चांदेवार, ग्यानबा निर्वाण, गोविंद अग्रवाल, रामावतार अग्रवाल, संपत अग्रवाल, नूतन पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.
बक्षीस वितरणासाठी आमदार सहषराम कोरोटे, माजी आमदार संजय पुराम, धनश्री सिमेंट प्रोडक्ट्स, पतिराम शेंद्रे, शिवकुमार परिहार, शंकरलाल अग्रवाल, शर्मा दूध डेअरी, कुवरलाल भेलावे, बाबुराव क्षीरसागर, भय्यालाल चांदेवार, छोटेलाल बिसेन आणि राजकुमार शाहू यांनी विशेष सहकार्य केले.
तर, यशस्वीतेसाठी प्रा. मधू शेंद्रे, संजय मलेवार, सुरेश चन्ने, कुलदीप लांजेवार, वसंत चुटे, अरुण बनपुरकर, प्रभू मनगटे, प्रकाश परिहार, जागेश ठवरे आदींनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share