रब्बी धान हंगामामधील शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी व धान खरेदीला मुदतवाढ द्या- आमदार कोरोटे
आमदार कोरोटे यांची आदिवासी विकास मंत्री अँड. के.सी.पाडवी यांना निवेदनातून मागणी.
देवरी 21: आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय देवरीअंतर्गत आदिवासी सहकारी संस्थे तर्फे सुरु असलेल्या रब्बी हंगाम २०२०-२१ मधील धान खरेदी केन्द्रावर शेतकऱ्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन अजुन पर्यन्त पूर्ण झाले नाही.त्यामुळे अजून पर्यंत धान खरेदी पूर्ण झालेली नाही. धान खरेदीची मुदत या महिन्यात संपत आहे. तरी रब्बी हँगामामधील शेतकऱ्यांचे ऑनलाइन राजिस्ट्रेशन व धान खरेदीला मुदत वाढ देण्याची मागणी आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अँड. के.सी.पाडवी यांना निवेदनातून केली.
यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव हे सुद्धा उपस्थित होते. रब्बी हंगाम २०२०-२१ मधील धान खरेदी केन्द्रावर आतापर्यंत एकूण ५१९५ शेतकऱ्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाले आहे. परंतु मागील हँगामाची तुलना केली तर हंगाम २०१९-२० या वर्षात रब्बी हंगामात एकूण ७४६५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करुण आपले धान खरेदी केन्द्रावर विक्री केली होती. त्यानुसार हंगाम २०२०-२१ व हंगाम २०१९-२०या दोन्ही हँगामाची नोंदणी कृत शेतकऱ्यांची फरक बघता एकूण २२७० शेतकऱ्यांची तफावत दिसत आहे.
२०२१-२१ हंगामात कोणताही शेतकरी हमी भावाच्या लाभापासुन वंचित राहु नये आणि शेतकाऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये. या दृष्टीने रब्बी धान खरेदी २०२०-२१ या हंगामात शेतकऱ्यांची ऑनलाइन रजिस्ट्रेशन व धान खरेदीला मुदतवाढ देण्यात यावे असा उल्लेख आहे.
अशा मागणीचे निवेदन आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अँड. के.सी.पाडवी यांना भेटून या विषयावर चर्चा करुण सादर केले. या प्रसंगी आदिवासी विकास विभागाचे सचिव सुद्धा उपस्थित होते.