नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था महाराष्ट्र राज्य, शाखा – देवरीची कार्यकारणी गठित
देवरी 21: नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्था शाखा देवरी,जिल्हा – गोंदिया ची कार्यकारणी गठित करण्यात आली.
यामध्ये देवरीचे स्थानिक युवक व युवतींचा समावेश असून इंजी.घनश्याम निखाडे-अध्यक्ष, सचिन भांडारकर- उपाध्यक्ष, इंजी. प्रीती नेताम – सचिव, इंजी. विक्की चौधरी-कोषाध्यक्ष, समीर साखरे-प्रसिद्धीप्रमुख, लेकचंद खंडाते व चंदन चंन्नेकर- सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
सदर संस्थेद्वारे पर्यावरण वाचवण्यासाठी व मानवी विकासासाठी विविध उपक्रम राबविन्याचे धैय ठरविले असून त्यात वृक्षारोपण ,विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जागृती , विज्ञान व तंत्र शिक्षणाचे धडे देणे, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण भागातील प्रश्न व इतर सामाजिक उपक्रमावर संस्था कार्य करते.