उद्या कार्तिक पौर्णिमा महोत्सवनिमित्त विठ्ठल रखुमाई मंदिरात कोरोना लसीकरण
देवरी 17: (प्रा. डॉ. सुजित टेटे ) सार्वजनिक विठ्ठल रखुमाई मंदिर देवरीच्या वतीने कार्तिक पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन 18 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर ला करण्यात आले असून कोरोना नियमाचे पालन करून उपस्थिती दर्शवावी असे निमंत्रण आयोजक सार्वजनिक विठ्ठल रखुमाई मंदिर समितीने केले आहे. विशेष म्हणजे महोत्सवाच्या प्रित्यर्थ दि 18 नोव्हेंबर ला सकाळी 11 ते 3 वाजताच्या दरम्यान कोरोना लसीकरणाचे आयोजन मंदिरात करण्यात आले असल्याचे समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
कार्तिक पौर्णिमा महोत्सवाची सुरुवात 18 नोव्हेंबर ला सायं 5 वाजता ज्योत प्रज्वलनकरून होणार असून महोत्सवाची सांगता 19 नोव्हेंबरला गोपाळकाला आणि महाप्रसाद वितरण करून होणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे.
कोरोनाचे लाटेकोरपणे नियम पळून सदर कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आणि कोरोना लसीकरण करून घेण्याचे समितीद्वारे आवाहन करण्यात आले आहे.