शिवसेना महिला आघाडी कार्यालयात बाळासाहेबांना आदरांजली

देवरी 17– शिवसेना महिला आघाडी गोंदिया जिल्हा कार्यालय येथे जिल्हा संघटक करुणा कुर्वे यांचे अध्यक्षतेखाली हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक मुस्लिम महिलांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

याप्रसंगी आमगाव विधानसभा संघटक राजीक खान, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष अनिल कुर्वे, शिक्षक सेना तालुका अध्यक्ष सुभाष दुबे, तालुका उपप्रमुख दालचंद मडावी, दिनदयाल मेश्राम, सदरु बंदेअली, लल्लन तिवारी, संतोष शाहू, शिवसेना महिला आघाडी तालुका संघटिका प्रिती उईके, तालुका उपसंघटिका सलमा पठाण, युवती सेना उपजिल्हा समन्वयक निलेशा रामटेके, शहर उपसंघटिका सारिका आयतुलवार आणि अनेक शिवसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें