गोंदिया जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रदुर्भाव

◼️वेळीच करा व्यवस्थापन ; कृषी विभागाने दिले टिप्स

गोंदिया ■ ढगाळ वातावरण तसेच अंधारी रात्र असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी देऊ शकतात. या सर्व बाबी घाटेअळीस पोषक असल्यामुळे सध्या घाटेअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी या अळीने प्रादुर्भाव करण्यास सुरुवात केली आहे. ही बहुभक्षी असून विशेषतः पीक फुलोऱ्यावर असताना प्रामुख्याने घाटे अवस्थेत नुकसानकारक असते. अळीचे व्यवस्थापन केल्यास नुकसान होणार नाही असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. यंदा पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे आता रब्बी पिकांतून ती नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी शेतकरी नियोजन आणि करीत असताना किडींमुळे नुकसान होत आहे.

Share