योग्य अनुभवी व कार्यक्षम व्यक्तीलाच गावाचा कारभारी करा ! गावागावात उमटतोय सुर, उमेदवारांची फिल्डिंग सुरु

गोंदिया ◼️ अवघ्या दोन दिवसांवर असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला घेऊन गावागावातील स्थानिक व पक्षीय राजकारणाला अधिकच पेव फुटले आहे. ७ डिसेंबरल उमेदवारी मगे घेणे व निवडणूक चिन्ह घेणे या प्रशासकीय प्रक्रीया झाल्यानंतर आत ग्रा. प. च्या निवडणुकीला खऱ्या अथाने रंगत आली आहे.

१८ डिसेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीत थेट जनतेमधून सरपंच निवडायचा असल्याने आपल्याच गटाचा सरपंच व सदस्य निवडून यावा यासाठी गावागावात असलेले राजकीय व स्थानिक प्रयत्नशिल असले तरी निवडून येणाऱ्या उमेदवारांनी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून घेणाऱ्या ग्रामविकासाच्या योजना, ग्रामस्तरावर राबवून गाव विकासाचे ध्येय ठेवलयास आदर्श गाणी संकल्पना पूर्ण होऊ शकते. याकडे कटाक्षाने गावपुढाऱ्यांनी लक्ष देणे श्रेयकर अहे. प्रचारा दरम्यान एकमेकांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांचे हेवे दावे काढून गावात निवडणुकीच ताप वाढविण्यापेक्षा गटातटाकडे न पाहता सुज्ञ मतदाांनी योग्य उमेदवारांना निवडून द्यावे असा सूर गावकऱ्यांमध्ये उमटत आहे. प्रत्येक गावातील नागरिकांना रस्ते, जि, पाणी, शिक्षण व आरोग्य आदी समस्या भेडसावत असतांना त्याकडे दुर्लक्ष करणे ही गोष्ट विकास कामात बाधा आणणी आहे.

ग्रामपंचायतीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार असून २० डिसेंबरला मतमोजणीचा निकाल लागणार आहे. गावागावांमध्ये निवडणुकीचे वारे वाहतांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कार्यकाळ संपलेल्या सरपंच व सदस्य या निवडणुकीसाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत.

अनेक गावांमध्ये आरक्षण सोडतीने काही उत्सुकांच्या आकांशावर पाणी फेरले आहे. काहींना शिक्षण आडवे आले, मात्र ज्या ठिकाणी जुन्या सरपंच व सदस्यांना उभे राहण्याची संधी आहे अशा ठिकाणी मात्र माजी उमेदवार संधीचे सोने करण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या अनुभवाचा उपयोग करून फिल्डिंग लावत आहे. तथापि मतदार ‘मी पुन्हा येईन ‘ च्या नाऱ्याला प्रतिसाद देतात की सत्ता बदल कतात. हे मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. एवढे मात्र निश्चीत.

Share