वनविभाग आणि कृषीविभागाने बांधला वनराई बंधारा

देवरी ◼️ वन विभाग आणि कृषी विभागाच्या उपक्रमात सहभागी होत पांढरवाणी गावातील लोकांच्या सहकार्याने पांढरवाणी गावालगतच्या नाल्यावर वनराई बंधारा बांधण्यात आला.

उन्हाळ्यात गावातील जनावरांसाठी व शेतीसाठी पाण्याची कमतरता भासते. म्हणून हा वनराई बंधारा बांधण्यात आला. अंदाजे बंधाऱ्यात लाखो लिटर पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.

सदर उपक्रमात वनविभागाचे चोपकर साहेब वनपाल, राठोड़ साहेब वनरक्षक , रहांगडाले साहेब.- कृषी सहायक, विजय जांभुळकर, मंगलदास मडावी, गोलु कोरेटी, विजय कुंभरे, भास्कर धानगुण गेंदलाल कोरेटी राजु परतेकी व समस्त गावातील नागरिकांचा सहभाग मिळाला.

Print Friendly, PDF & Email
Share