देवरी: रानभाजी महोत्सवाचे थाटात उद्घाटन, कृषी विभागाचे स्तुत्य उपक्रम
देवरी ◼️तालुका कृषी अधिकारी कार्यालय, देवरी व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने दिनांक 10/8/2023 ला पंचायत समिती देवरी च्या प्रांगणामध्ये रानभाजी महोत्सव, पौष्टिक तृणधान्ये आंतरराष्ट्रीय वर्ष व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सकाळी 11.00 वाजता रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन सविताताई पुराम सभापती, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद गोंदिया यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उषाताई शहारे, जिल्हा परिषद सदस्य, ककोडी क्षेत्र, अंबिकाताई बंजार सभापती, पंचायत समिती देवरी, संजू भाऊ उईके नगराध्यक्ष, नगरपंचायत देवरी, हिंदुराव चव्हाण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया, मंगेशजी वावधने, उपविभागीय कृषी अधिकारी देवरी, दीपक ढोरे खंडविकास अधिकारी, पंचायत समिती देवरी, डॉ. लालन राजपूत, तालुका कृषी अधिकारी देवरी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. लालन राजपूत तालुका कृषी अधिकारी देवरी, यांनी केली. प्रस्तावनामध्ये त्यांनी रानभाज्यांचे महत्त्व समजावून सांगून रानभाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करण्याचा आव्हान केले. तसेच मा.श्री हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया, यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत उपस्थितांना मार्गदर्शन केले व योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. मंगेश वावधने, उपविभागीय कृषी अधिकारी देवरी, यांनी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 या विषयी माहिती दिली तसेच तृणधान्यांचा आपल्या आहारातील महत्त्व विशद करून सर्वांना तृणधान्यांचा आपल्या दैनंदिन आहारात वापर करण्याचे आवाहन केले..
रानभाजी महोत्सवामध्ये उमेद व माविम च्या महिला बचत गटांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. सदर महोत्सवात पिंपळपान, करटोली, केना, पातुर, मटारू, अंबाडी, करवंद, खापरखुटी, सुरण, भुई आवळा, शेवगा पाने व शेंगा, केवकांदा इत्यादी प्रकारच्या भाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच पौष्टिक तृणधान्य मध्ये नाचणी, बाजरी, ज्वारी, कोदो व राजगिरा इत्यादी तृणधान्ये स्टॉलमध्ये ठेवण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या कार्यक्रमांमध्ये सुरेश धांडे, कृषी अधिकारी देवरी, कु. कुमुदिनी बोरकर, मंडळ कृषी अधिकारी देवरी, यासीन शेख तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, कार्यालयातील सर्व कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक व कृषी सेवक उपस्थित होते.