देवरीच्या दुर्गा चौकातून रक्कम उडवणाऱ्या २ चोरट्यांना अटक

देवरी: दुचाकीच्या हॅण्डलला लटकवलेला थैला चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना देवरी पोलिसांनी दि. १६ च्या पावणेबाराच्या सुमारास अटक केली. हैदरअली ईमदाद अन्सारी (वय ५४) व वसीम खान वकार अहमद खान (वय ४२, दोघेही रा. दुर्ग, छत्तीसगड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

याबाबत फिर्यादी अशोक मोतीराम रहिले (वय ५१, रा. शिलापूर, ता. देवरी) यांनी देवरी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, अशोक रहिले हे शनिवारी (ता. १४) सकाळी अकराच्या सुमारास  १७ हजार रुपये बॅंक आॅफ इंडियाच्या देवरी येथील आपल्या खात्यात जमा करण्यासाठी गेले होते. परंतु, शनिवारी बॅंक बंद असल्याने ते नंतर आैषधी घेण्यासाठी आशीष मेडिकलमध्ये गेले. यावेळी त्यांनी मेडिकलसमोर दुचाकी उभी करून रोख १७ हजार रुपये, मोबाइल आणि बॅंक पासबुक असलेला थैला दुचाकीच्या हॅण्डलला लटकविला होता. आैषध घेऊन परत आल्यावर त्यांना थैला दिसला नाही. याबाबतची तक्रार त्यांनी देवरी पोलिसात केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत या घटनेतील आरोपी हैदरअली ईमदाद अन्सारी व वसीन खान वकार अहमद खान यांना सोमवारी अटक केली.  या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार हातझाडे करीत आहेत. याच आरोपींनी सोमवारी (ता. १६) आमगावच्या अॅक्सीस बॅंकेसमोरून दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें