
जनजागृती करून वाढविला लसीकरणाचा टक्का, जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा शेडेपारचा उपक्रम
?देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांची महत्वाची भूमिका
?दूरदृष्टी आणि नियोजनबद्ध कार्यातून तालुक्यातील लसीकरणाचा टक्का वाढविला
डॉ.सुजित टेटे / देवरी 5: तालुका आदिवासी आणि ग्रामीण भागाने वेढलेला असून शासनाने राबविलेल्या लसीकरणाला ग्रामीण भागात प्रतिसाद का ? मिळत नाही यावर चिंतन करून देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी तालुक्यातील लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असून त्यांच्या कार्याची प्रचिती ग्रामीण भागातिल लसीकरणाच्या वाढत्या टक्कामुळे येत आहे.
तालुक्यातील विविध आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करून तसेच जनजागृती करून ग्रामीण लोकांना लसीकरण करण्यासाठी जिप शाळेच्या शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली असून गावात उपलब्ध करून दिलेले लसीकरणाचे डोज 100% लसीकरण करून कोरोनाला हरविण्याचा सकरात्मक संदेश देत आहेत.
नुकतेच जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा शेडेपार येथे पहिले 1 टक्के लसीकरण झाले होते मात्र नंतर गावात रोजगार हमीची कामे सुरू झाली प्रत्यक्ष त्या ठिकाणी एम के चव्हाण (स शी)शेडेपार यांनी लोकांना लसीचे महत्व पटवून दिले आणि दुसऱ्या दिवशी लसीकरण चा कँप आयोजित केला त्यात 50 लोकांचे लसीकरण करण्यात आले. नंतर पुन्हा एकदा एम के चव्हाण आणि शाळेचे मुख्याध्यापक ए बी नंदागवळी , डी डी उईके स शि , कु. ए व्ही मेश्राम यांनी भेट देऊन 70 लोकांचा कँप आयोजित केला आणि त्यात लोकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला.
तसेच गावाचं एक व्हाट्स अँप ग्रुप तयार करून लसीकरण विषयीचे सकारात्मक बातम्या याची प्रसिद्ध दाखवून लोकांचा लसीकरण विषयी चा नकारात्मक दृष्टीकोन बदलून त्यांना लस घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यात यश प्राप्त झाले तर जवळपास 6 दिवसात 50 टक्के लसीकरण या गावात झाले आहे.
या करिता आरोग्य विभागाने सुद्धा खूप मेहनत घेऊन लसीकरण केलं तसेच आशा सेविका लांजेवार ताई , तिरपुडे ताई ग्रामसेवक देशमुख साहेब , आरोग्य सेवक शहारे सर आणि त्यांची टीम यांनी मोलाची कामगिरी केली.
विशेषतः मा तहसीलदार विजय बोरुडे साहेब यांच्या प्रयत्न ने या गावाला आतापर्यंत 120 डोस प्राप्त झाले व त्याची सर्व कर्मचारी यांनी योग्य अंमलबजावणी केली
या लसीकरण च्या यशस्वीते साठी सरपंचा सौ माधुरी ताई राऊत आणि त्यांचे सर्व सदस्य व कर्मचारी आणि केंद्राप्रमुख जी एम बैस यांनी विशेष मार्गदर्शन केले. विश्वनाथ लांजेवार, सुशोधन मेश्राम , हितेश हटवार , सोनुताई निखाडे, शिशुपाल तिरपुडे पोलीस पाटील , रामभाऊ हटवार आणि सर्व गावातील युवक मंडळी यांनी सहकार्य केला .
100% लसीकरण Success Story :
सावली शाळेतील लसीकरण 100% यशस्वी