“RSS ला कोरोनापेक्षा नरेंद्र मोदींच्या उतरत्या लोकप्रियतेची चिंता”

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था आणि पश्चिम बंगालमच्या विधनसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी होत चाललं असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचं चिंतन सुरु आहे. या बैठकीचा आज समारोप झाला. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संघावर निशाणा साधला आहे.

संघाच्या मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेवरील चिंतन बैठकीतून पुढील गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. एक म्हणजे संघ ही सांस्कृतिक संघटना नसून राजकीय संघटना आहे. तर दुसरी संघाचा बोगस राष्ट्रवाद- मोदींना सत्तेसाठी जनता मरते का जगते याची चिंता नाही याचप्रमाणे संघाला कोरोनापेक्षा मोदींच्या ढासळत्या लोकप्रियतेची चिंता आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

संघाच्या बैठकीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत, नवनियुक्त सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्व पाच सहसरकार्यवाह, भैय्याजी जोशी. तसंच भाजपचे महामंत्री बी. एल. संतोष यांच्यासह संघाचे मोठे पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. याआधीही सावंत यांनी भाजपवर टीका केली होती.

दरम्यान, भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष आहे. ‌सदर टूलकिट हे बनावट आहे. मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागळलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा बनाव भाजपाने रचला आहे,’ असा गंभीर आरोप सावंत यांनी केला होता.

Print Friendly, PDF & Email
Share