नवाटोला येथे ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण
देवरी : नवाटोला (ता. देवरी) येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा प्रारंभ आरोग्य सेविका कु.बि. के. टेम्भूर्णे, सरपंच लखनलाल पंधरे यांच्या हस्ते करण्यात आले.
धोबीसराड (ता. देवरी) उपकेंद्रांतर्गत नवाटोला येथील ४५ वर्षांवरील ग्रामस्थांची कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम १०० टक्के पूर्ण झाली आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानेच हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया आरोग्य सेविका कु. बि. के. टेम्भूर्णे यांनी व्यक्त केली. आरोग्य विभागातर्फे सरपंच, सचिव, सदस्य, आशा सेविका, आणि अंगणवाडी सेविका यांचे विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील ४५ वर्षांवरील ग्रामस्थांनी लस घेतल्याने आता गाव कोरोनामुक्त हाेण्यास मदत हाेणार आहे. या लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य सेविका बि. के. टेम्भूर्णे, आशा सेविका सारिका साखरे, आरोग्य मदतनीस मीना रामटेके, अंगणवाडी सेविका सरिता रहिले, ग्रामसेवक सि. आर. चाचेरे, सदस्य योगराज साखरे, सदस्य नंदलाल नेताम, मुख्याध्यापक मेंडे सर, सूर्यवंशी सर,आपरेटर रेवचंद खोटेले, परिचर प्रमोद मडावी आणि अंगणवाडी मदतनीस मोतीन मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले.