बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीनं घेतला सोशल मीडियावरून ब्रेक, पोस्ट करत दिली माहिती

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेनेही आपल्या करिअरची सुरूवात ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेमधून केली. अंकिताने या मालिकेमध्ये ‘अर्चना’ची भूमिका केली होती. तिने आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनात एक स्थान निर्माण केलं आहे.

अंकिता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सतत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबद्दल चाहत्यांना माहिती देत असते. तसेच ती फोटो, व्हिडीओही वारंवार पोस्ट करत असते. अशातच तिने एक फोटो पोस्ट केला आहे.

त्यामध्ये It’s not a goodbye, it’s a see you later’ असं लिहिलं आहे. यावरून अंकिता आपल्या सोशल मीडियावरून ब्रेक घेणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अंकिताच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे.

तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने तर ‘सुशांत सिंह राजपूत’च्या सोशल मीडियावरील पोस्टच्या एक वर्षांनंतर अंकिताने ब्रेक घेतला आहे. सुशांतने मागील वर्षी जूनला शेवटची सोशल मीडिया पोस्ट केली होती आणि त्यानंतर 14 जूनला त्याच्या मृत्यूची बातमी आली होती.

Print Friendly, PDF & Email
Share