सावली शाळेतील लसीकरणात सावली पंढरपूर ग्रामवासी यांचा भरभरून प्रतिसाद

देवरी 5: जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली करण्याचे आयोजन करण्यात आले. लसीकरणामुळे कोरोना पासून बचाव होऊ शकतो याविषयी दीपक कापसे मुख्याध्यापक सावली यांनी गावात जनजागृती केली. तसेच गावात व्हाट्सअप द्वारे लसीकरणाविषयी जनतेच्या मनात लस न घेण्याविषयी भ्रामक कल्पना व संकाचे निरसन केले. दुसऱ्या टप्प्यात 50 लसीचा टारगेट देण्यात आला होता. त्यापेक्षा जास्त 60 लसीकरण करून 100% ग्रामवासी यांनी प्रतिसाद दिला. सोबतीला अशोक सरजारे मुख्याध्यापक पंढरपूर, एच.एम.राऊत , पुरुषोत्तम जनबंधू, दीपक लांजेवार ,नंदकिशोर शेंडे, तुषार कोवाले, कू.वर्षा वालदे यांनी इच्छुक लोकांची यादी तयार करून लसी करणासाठी प्रोत्साहित केले.

मा. विजय बोरुडे तहसीलदार यांचे प्रेरणेने 40 डोस देण्यात आले ते शंभर टक्के यशस्वीपणे करण्यात आले.
लसीकरन केंद्राला डी बी. साकुरे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी देवरी. जगणे सर केंद्रप्रमुख डोंगरगाव ,डॉ. संतोष येरणे कु. बी.व्ही.कावळे सिस्टर ,कु. झलके सिस्टर मीनाताई अंगणवाडी सेविका, महारवाडे ताई आशा सेविका लसीकरणा वेळी उपस्थित राहून योग्य प्रकारे कोविड नियमाचे पालन करून लसीकरण उत्कृष्ट रित्या पार पाडले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ पंधरे सरपंच , सौ. बिजलेकर उपसरपंच , चंद्रसेन रहांगडाले पो.पा. ,बिजलेकर सर , रामेश्वर पवार शा.व्या.समिती अध्यक्ष , कैलास भेलावे, शिवणकर ग्रामसेवक , सुनिल भेलावे , अनिल भेलावे, दीपक शेंडे यांनी मोलाचे सहकार्य केले. पुढील लसीकरण याच प्रमाणे शंभर टक्के पार पडेल अशी आशा बाळगून जनतेच्या मनातील शंका ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समिती यांच्या सहकार्याने पार पाडू असे दीपक कापसे मुख्याध्यापक यांनी सांगितले उपस्थितांचे आभार मानले.

Print Friendly, PDF & Email
Share