खबरदार..! किंमती वाढवून रासायनिक खते विकाल तर..

?रासायनिक खतांची अव्वाच्या सव्वा भावात होणार्‍या विक्रीला आळा बसणार ?

?शेतकर्‍यांची होणारी लूट थांबणार ?

डॉ सुजित टेटे / प्रहार टाईम्स

गोंदिया 5: रासायनिक खते खरेदी मध्ये होणारी शेतकर्‍यांची लूट आणि फसवणूक थांबविण्यासाठी जिल्हा कृषि यंत्रणा सज्ज झाली असून येणार्‍या खरीप हंगाममध्ये कृषि सेवा केंद्रांनी रासायनिक खतांची शासनाने ठरवून दिलेल्या दरात विक्री करावी असे आदेश सर्व कृषि केंद्रांना निर्गमित केले असून जर कृषि केंद्र चालक अव्वाच्या सव्वा भावात किंवा किंमत वाढवून विकत असेल तर त्याची तक्रार जिल्हा कृषि विभागाच्या तक्रार निवारण केंद्रास संपर्क करून करावे, तालुका कृषि अधिकारी यांना तक्रार करावी असि माहिती जिल्हा कृषि अधीक्षक गणेश घोपरडे यांनी माध्यमांना दिली आहे.

खरीब हंगामात शेतकर्‍यांना भासणारी गरज लक्षात घेऊन खतांची योग्य दरात विक्री व्हावी आणि काळाबाजार होणार नाही या दृष्टीने 20 मे 2021 पासून सुधारित दरपत्रकानुसार रासायनिक खतांच्या 50किलोच्या बॅग च्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. रासायनिक खतांच्या किमती खालील प्रमाणे आहेत.

किंमती

वरील शासनाने ठवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने खतांची विक्री होत असल्यास सबंधित कृषि सेवा केंद्रावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

देवरी तालुक्यात एकूण 32 कृषि सेवा केंद्र असून कृषि केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आलेले आहे.

तालुका गुणनियंत्रण कक्ष देवरी अंतर्गत तालुका निरीक्षक पथक –

  • तालुका कृषि अधिकारी देवरी
  • कृषि अधिकारी पंचायत समिति देवरी
  • कृषि विस्तार अधिकारी पंचाय समिति देवरी
  • कृषि अधिकारी कार्यालय देवरी
  • मंडल कृषि अधिकारी देवरी
  • मंडल कृषि अधिकारी चीचगड

यांचा समावेश करण्यात आलेला असून स्टॉक रजिस्टर वासून तपासणी सुरू असल्याची माहिती कृषि अधिकारी यांनी दिली.

  • शेतकऱ्यांनी कृषी केंद्र चालकाला पक्का बिल मागावा
  • वजन आणि किंमत तपासून बघावी
  • वाढीव किंमत आकारात असल्यास तक्रार करावी

शासनाने ठरवून दिलेल्या दर पत्रकानुसार रासायनिक खतांची विक्री करणे बंधनकारक आहे. नियमचे उलंघण करून रासायनिक खते विक्री करणार्‍या कृषि केंद्राला व स्टॉक ला सील ठोकली जाणार असून कायदेविषयक कार्यवाही करण्यात येईल. – जी जी तोडसाम तालुका कृषि अधिकारी देवरी

तक्रार असल्यास शेतकर्‍यांनी खालील अधिकार्‍यांशी संपर्क साधावा –

जी जी तोडसाम तालुका कृषि अधिकारी देवरी – 9404306342

श्री चंद्रकांत कोळी मंडल कृषि अधिकारी चीचगड/देवरी 9403772804

श्री विकास कुंभारे मंडल कृषि अधिकारी देवरी 9423192083

Share