दोन ‘पुराम’च्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा ‘गुलाल’ कोण उडवणार?
भुपेन्द्र मस्के
उपसंपादक,प्रहार टाईम्स न्युज नेटवर्क
आमगाव/ देवरी: गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघांमध्ये भाजपाला हमखास यश देणारा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमगाव मतदारसंघात भाजपाचे माजी आमदार संजय पुराम व नवखे उमेदवार राजकुमार पुराम यांच्यात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळत आहे. यामुळे या लढतीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
या मतदारसंघात एकूण ०९उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, मुख्य लढत भाजपाचे माजी आमदार संजय पुराम व काँग्रेसचे राजकुमार पुराम यांच्यातच आहे. हे दोन्ही उमेदवार आतापर्यंत अनुसूचित जमातीच्या राखिव जागेवर २००९ मध्ये आमदार होण्याचा मान रामरतनबापू राऊत यांना मिळाला. २०१४ मध्ये राऊत यांचा पराभव करत संजय पुराम यांनी बाजी मारली. तर २०१९ मध्ये भाजपाचे संजय पुराम यांचा पराभव करत काँग्रेसचे सहसराम कोरोटे यांनी गड राखला. हा इतिहास पाहता या मतदारसंघात मतदारांनी प्रत्येक निवडणुकीत बदल घडवून आणलेला दिसत आहे. त्यामुळे आता बदल अटळ दिसत आहे. त्यामुळे संजय पुराम यांचा विजय दिसत आहे.
संजय पुराम यांच्या प्रचारातील मुद्दे
*मतदारसंघातील रस्त्यांची कामं मार्गी लावण्यात आली.
*अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची कामं मार्गी लावण्यात.
*आमदारकिच्या कालावधीत केलेले काम
*भाजप सरकारने राबविलेल्या योजना विशेषतः लाडकी बहिण.
राजकुमार पुराम यांचे प्रचारातील मुद्दे
*शिक्षण, आरोग्य,उपजिविका,व मानव विकास निर्देशांक वाढवणे.
*मतदारसंघातील रखडलेले काम, मुद्दा. लाडकी बहीण योजनेला निधी दिला, दुसरीकडे महागाई वाढली.
अशा काही मुद्यांवर निवडणुक गाजली असली तरी आमगाव व सालेकसा तालुक्यातील मतदाराचा कल हा नेहमी भाजपकडे असते. व देवरी तालुक्यात नेहमी काँग्रेस वरचढ ठरते.त्यामुळे चुरस वाढते. अशावेळी दोन्ही पक्षांनी शेवटची मतपेटी उघडल्या शिवाय गुलाल उधळता येणार नाही अशी काहीसे चित्र दोन्ही पक्षांच्या उमेदवारांत व कार्यकर्त्यामध्ये आहे.