मतदानाला उत्साहात प्रतिसाद, संजय पुराम यांचे सहपरिवार मतदान

देवरी: (प्रहार टाईम्स) राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू झाले आहे. महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत अंदाजे 6.61 टक्के मतदान झाल्याची निवडणूक आयोगाची माहिती आहे. राज्यातील 288 जागांवर विविध पक्षांचे एकूण 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान सुरू आहे. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आमगाव देवरी विधानसभेचे उमेदवार संजय पुराम आणि सविता पूराम यांनी सहपरिवार मतदान करीत, लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अनेक मतदारसंघांवर सकाळपासूनच रांगाच रांगा लागल्या आहेत. मतदार मोठ्या संख्येने मतदानाला उतरल्याने मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. आज संध्याकाळी उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून येत्या 23 तारखेला त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

Share