मतदान केंद्रावर मोबाइल बंदीमुळे मतदान कमी होण्याची भीती

Prahar Times : लोकसभेच्या निवडणुकप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर मतदारांना मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदारांना मतदान केंद्रावर मोबाइल नेता येणार नाही किंवा मोबाइल नेला तरी तो बाहेर ठेवण्याची जबाबदारी मतदारांचीच असणार आहे. ही बाब मुंबी महापालिका आयुक्त आणि मुंबईचे निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केली. मात्र मोबाइल बंदीच्या नियमामुळे मुंबईत मतदान कमी होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

Share