ब्लॉसम पब्लिक स्कुलमध्ये आनंदमेळा उत्साहात संपन्न
रूप रिसोर्टचे संचालक यादवराव पंचमवार यांची उपस्थिती
देवरी ◼️स्थानिक ब्लॉसम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली असून यावेळी आनंदमेळाव्याचे आयोजन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रूप रिसोर्ट चे संचालक यादोराव पंचमवार, संस्थेचे अध्यक्षा अंकिता रुईया, नकुल रुईया , प्राचार्य डॉ. सुजित टेटे उपस्थित होते. उद्घाटनीय फीत कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आनंदमेळा मध्ये 90 विध्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते. पालकांनी मोठ्या संखेने आनंदमेळाव्यात हजेरी लावली होती. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवाणी यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी अनुभवली. प्रत्येक स्टॉलचे निरीक्षण करून सर्वांना गुणदान करण्यात आले. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. विद्यार्थी जिवनात व्यावसायीक ज्ञान मिळावे या उद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विभागाचे नितेश लाडे आणि विश्वप्रीत निकोडे यांनी महत्वाची भूमिका बजावली. संचालन सरिता थोटे आणि राहुल मोहुर्ले यांनी केले. आभार वैशाली मोहूरले यांनी मानले. कार्यक्रमाला मुर्तरूप देण्यासाठी आकांक्षा डिब्बे, तेजस्विनी नंदेश्वर, राजू सोरते यांच्यासह शालेय कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.