गोंदिया ते पुणे पत्रकारितेचा प्रवास केल्यांनतर राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्काराने गोपाल मोटघरे यांचा सन्मान

प्रहार टाईम्स: गोंदिया सारख्या आदिवासी बहुल नक्षल ग्रस्थ जिल्यातून पत्रकारितेला सुरवात करून पुणे जिल्यात गेल्या १२ वर्षा पासून पत्रकारिता करीत असलेल्या गोपाल मोटघरे यांना या वर्षी राज्यस्तरीय *पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर झाला असून एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या संपादिका सरिता कौशिक, पद्मश्री गिरीश प्रभुणे, ज्येष्ठ कामगार नेते यशवंतभाऊ भोसले आणि लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांच्या हस्ते पुणे जिल्याच्या पिंपरी चिंचवड शहरातील साम टीव्ही न्यूज चे प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांना राज्यस्तरीय *पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मराठी पत्रकारितेचे जनक दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त राज्यात ६ जानेवारीला मराठी पत्रकार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान या दिनाचे अवचित्य साधून करण्यात येतो.याच दिवसाच्या निमित्ताने आज निगडी येथील कविवर्य ग.दि माडगूळकर सभागृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तर्फे दिला जाणारा राज्यस्थरीय पत्रकार भूषण पुरस्कार गोपाल मोटघरी यांना देऊन सन्मानित करण्यात आल आहे.
गोपाल मोटघरे यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात गोंदिया सारख्या नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल जिल्यात IBN लोकमत या वृत्तवाहिचे प्रतिनिधी म्हणून वर्ष २००७ ला सुरवात केली त्या नंतर वर्ष २०१२ ते २०१८ या काळात पुणे शहरात IBN लोकमत या वृत्तवाहिनी मध्ये प्रतिनिधी म्हणून काम केलं. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी साम टीव्ही न्यूज या मराठी वृत्तवाहिनीसाठी एक वर्ष पुणे शहरात पत्रकारिता केली. त्या नांतर २०२० ला त्यांनी AM न्युज ह्या मराठवाड्यातून सुरू झालेल्या वृत्तवाहिनीसाठी एक वर्ष पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा २०२१ मध्ये साम टीव्ही न्यूज या वृत्तवाहिनी साठी पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारितेला सुरुवात केली तर गोपाल मोटघरे यांनी जवळपास 17 वर्षाच्या पत्रकारितेच्या काळात त्यांनी केलेल्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना जिल्हा पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले तर आज गोपाल मोटघरे यांना राज्य स्थरीय पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे .पिंपरी चिंचवड शहरातील एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व, एक संवेदनशील आणि अभ्यासू पत्रकार अशी गोपाल मोटघरे यांची ओळख आहे. नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल भागात काम करताना गोंदिया सारख्या जिल्यात त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात अनेक पत्रकार घडवीत पुणे शहरात धाव घेत गोपाल मोटघरे यांनी पत्रकारितेच्या जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याच मुळे त्यांच्या कार्याची दखल घेत या वर्षी त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तर्फे दिला जाणारा राज्यस्थरीय पत्रकार भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.

Share