त्या अपघातातील चालक वाहनासह पोलिसांच्या ताब्यात
देवरी: चिचगड मार्गावरील सालई नजिक झालेल्या हृदयदावक अपघातातील आरोपी वाहन चालक आणि अपघाताला कारणीभूत ट्रॅक्टर देवरी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या अपघातात दुचाकी चालकाचा मुंडके धडावेगळे झाल्याची घटना काल सोमवारी(दि.६ ) रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली होती. ज्यात वाहन (ट्रक्टर) चालक वाहनासह घटना स्थळावरुन पसार झाला होता. आज मंगळवारी ( दि.७ ) रोजी देवरी पोलिसांनी वाहन व वाहन चालकाचा शोध घेत असतांना त्यांला ताब्यात घेन्यात आले आहे.
सविस्तर असे की, राजेश आत्माराम कराडे वय ३२ वर्षे रा. मोहगाव (आलेवाडा) ता.देवरी जि. गोंदिया हा नेहमी प्रमाणे काल सोमवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजे दरम्यान देवरी ये थील एम.आय.डी.सी येथिल काम संपल्यावर आपल्या दुचाकीने ( दुचाकी क्र. एम.एच.३५ ए.व्ही. २९६८) ने आपल्या गावाकडे परत जात असतानां, टिनाचे सेट व ईतर साहित्य घेऊन जाना-या बिना नंबर प्लेटच्या ट्रक्टर ला चिचगड रोडावरील सालई गावाजवळ निकेशच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. हि धडक इतकी भीषण होती की निकेशचे मुंडके धडापासून वेगळा होवून त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
सदर घटना घडताच घटना स्थळावरुन ट्रक्टर चालक हा ट्रक्टर घेऊन पसार झाला होता. देवरी पोलिसस्टेशनचे पोलिस कर्मचारी राम कांदे, अनिल ऊईके , पंकज राहागंडाले,श्री कापसे, करंजेकर , रोशन डोये यांनी या घटनेचा तपास करून या घटनेतील ट्रक्टर चालकाला ट्रक्टरासह ताब्यात घेतले आहे. या घटनेचा तपास वरिष्ट अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गीता मुळे करीत आहेत.