वनविभागाच्या महिला तक्रार निवारण (विशाखा समितीची) मासिक सभा

देवरी : वनविभागाच्या महिला तक्रार निवारण (विशाखा समितीची) मासिक सभा दक्षिण स्थानिक वनक्षेत्र कार्यालयात m जि.प. महिला व बालविकास सभापती सविता पुराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . प्रशासनात काम करताना अनेक अडचणींचा सामना महिलांना करावा लागतो. पुरुषाच्या तुलनेत महिला थोड्या अधिक भावनिक राहतात. मात्र, मनात कठोरता निर्माण करण्याची गरज आहे. शासनाच्या पती-पत्नी एकत्रीकरण कायद्यानुसार पती-पत्नींची सेवा जवळ असणे आवश्यक आहे. मात्र, या कायद्याचे उल्लंघन केले जात असल्याचे सविता पुराम यांनी यावेळी सांगितले. मासिक सभेला अध्यक्षा शीतल येळे, सचिव वनरक्षक स्नेहा घुमडे, भाग्यश्री प्रधान, हेमंतपुरी गोस्वामी, स्नेहा वाघ, वनरक्षक एल. बी. कुमेरिया वनरक्षक, शांता लांजेवार, मंथुरा ओंकार, शिल्पा वासनिक उपस्थित होत्या.

Share