देवरी पंचायत समिती सभापतीपदी अनिल बिसेन तर उपसभापती शालिकराम गुरनूले

देवरी २०ः पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाकरीता आज २० जानेवारीला निवडणूक झाली असून सर्वसामान्य करीता राखीव असलेल्या सभापती पदावर गोटाबोडी पंचायत समिती क्षेत्राच्या सदस्य अनिल बिसेन यांची तर उपसभापती पदावर पालंदूर पंचायत समिती सदस्य शालिकराम गुरनुले यांची निवड झाली आहे.भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांनी निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार यांच्या समक्ष आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.सभापती पदाच्या स्पर्धेत १ फॉर्म दाखल झाला होता आणि उपसभापती पदाच्या स्पर्धेत १ फॉर्म दाखल झाले होते.

Share