एकलव्य स्कूल बोरगाव येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचे तीन दिवशीय अभ्यास शिबिर संपन्न

देवरी: देवरी तालूक्यातील बोरगाव बाजार येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी व आत्मविश्वासाने परीक्षेत सामोरे कसे जाता येईल यासाठी नेस्ट नवी दिल्ली व महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक मार्फत इयत्ता दहावीच्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांकरिता तीन दिवसीय अभ्यास शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या अभ्यास शिबिरात EMRS अहेरी जिल्हा गडचिरोली, EMRS देवाडा, जिल्हा चंद्रपूर आणि EMRS बोरगाव बाजार जिल्हा गोंदिया या शाळेतील इयत्ता दहावीचे एकूण १४१ विद्यार्थी व वि‌द्यार्थिनी उपस्थित होते. या शिबिरा च्या पहिल्या दिवशी उ‌द्घाटन प्रसंगी बोरगाव बाजार येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळेचे मुख्याध्यापक खेडकर,छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथील नवोदय विद्यालयातील गणित विषयाचे टी.जी.टी. स्नेह अग्रवाल,आणि इंग्रजी विषयाचे पी.जी.टी. कल्पना पॉल ,तसेच एकलव्य पब्लिक स्कुल शाळेचे प्राचार्य गणेश कुमार तोडकर यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
प्रथम दिवशी इंग्रजी व गणित विषयाचे मार्गदर्शन तासिका झाले तर दुसऱ्या दिवशी नवेगाव बांध येथील नवोदय विद्यालयाचे भुगोल विषयाचे पी.जी.टी. जागेश्वर चौरे यांनी समाजशास्त्र विषयाचे मार्गदर्शन केले. शिबिरा च्या तिसऱ्या दिवशी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथील नवोदय विद्यालयातील रसायन विषयाचे पी.जी.टी. वसीम खान यांनी विज्ञान विषयाचे मार्गदर्शन केले तर देवरी येथील एम.बी.पटेल महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. रोशन नासरे यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयी मार्गदर्शन केले. तिन दिवसाचे अभ्यास शिबिर समारोप प्रसंगी मंगळवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता देवरीचे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कविता गायकवाड यांनी वि‌द्यार्थ्यांना प्रोत्साहन पर माहिती दिली, आपले जिवाणू भाऊ विद्यार्थ्यांसमोर विचार मांडून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यास मदत केली त्यांच्या भाषणातून “आत्मविश्वा सासारखी दुसरी दैवी शक्ती नाही” हे सुवचन प्राप्त झाले.
सदर कार्यक्रमाच्या निरोप प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय उमाशंकर जाळे, शासकीय कन्या आश्रम शाळेचे मुख्याध्यापक खेडकर व एकलव्य शाळेचे प्राचार्य गणेश कुमार तोडकर तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराचे शेवट तसेच मान्यवरांचे आभार इंग्रजी विषयाचे पी.जी.टी. विजयकुमार मोरे यांनी मानले.

Share