स्वतःच्या रायफलने गोळी झाडून पोलिस हवालदाराची आत्महत्या
Deori : अर्जुनी मोरगांव तालुक्यातील नवेगावबांध जवळील एओपी धाबे पवनीमधील पोलिस हवालदार पदावर कार्यरत जयराम कारू कोरेट (50 वर्ष ) रा. संबूटोला/ कडीकसा तालुका देवरी जिल्हा गोंदिया, बक्कल क्रमांक 24 याने 16 जानेवारीला स्वतःच्या सर्विस रायफल्सने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस हवालदार एओपी धाबे पवनी येथे कार्यरत होता. तूर्तास आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सदर घटनेचा तपास नवेगावबांध पोलीस स्टेशनच्या ठाणेदार योगिता चापले करीत आहेत.