इंटरनेट सेवा महागली; ग्राहकांनची होते मोठी लुट!

देवरी: इंटरनेट सेवा मागील दोन ते तीन वर्षांपासून चांगलीच महागली आहे. इंटरनेट डेटाचे दर वाढल्याने विद्यार्थी तसेच तरुण- तरुणींसोबत सर्वसामान्यांना झळ पोहोचू लागली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजट वर परिणाम पडला आहे.नागरिकांना इंटरनेटची सवय झाली आहे. त्यामुळे महागडा रिचार्ज करावा लागत आहे. खासगी दूरसंचार मोबाइल कंपन्यांनी काही वर्षांपूर्वी मोफत सीमकार्ड वाटप करून इंटरनेटसह अनलिमिटेड कॉलिंगच्या अनेक सुविधा माफक दरात उपलब्ध करून देत भुरळ घातली. अनेक खासगी कंपन्यांनी ग्राहकांना आपल्याकडे ओढून आता आर्थिक नफा कमविण्यास प्रारंभ केला आहे. ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने या विरोधात कुणीही आवाज उठविताना दिसत नाही.

Share