मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

देवरी: आमगाव ६६ विधानसभा क्षेत्रात मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाले असून विधानसभेत एकूण 72.42% मतदान झाले आहे. यात एकूण 1 लाख 95 हजार 184 मतदारांनी आपला हक्क बजावला. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होत असून आमगाव विधानसभा मतदारसंघात मतमोजणीकरीता एकूण 14 ईव्हीएम टेबल आणि 5 पोस्टल बॅलेट टेबल 23 फेऱ्या राहणार आहे.

गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मध्ये होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या टेबल बद्दलची माहिती

63 – अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी कृषि उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथे 14 ईव्हीएम मतमोजणी टेबलवरुन होणार आहे. 6 पोस्टल बॅलेट टेबल व 1 ईटीपीबीएस टेबल. यामध्ये 23 फेऱ्या होणार आहेत. यावेळी 120 अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

64 – तिरोडा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय आयटीआय तिरोडा येथे 20 ईव्हीएम मतमोजणी टेबलवरुन होणार आहे. यामध्ये 22 फेऱ्या होणार आहेत. यावेळी 18 मतमोजणी अधिकारी राहणार असून 150 मतमोजणी कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. 65 – गोंदिया विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी पॉलिटेक्निक कॉलेज फुलचूर पेठ गोंदिया येथे 14 ईव्हीएम मतमोजणी टेबलवरुन होणार आहे. 6 पोस्टल बॅलेट टेबल व 1 ईटीपीबीएस टेबल. यामध्ये 26 फेऱ्या होणार आहेत. यावेळी महसूल व इतर विभागाचे 200 अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. 66 – आमगाव विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय आयटीआय देवरी येथे होणार आहे. 14 ईव्हीएम मतमोजणी टेबलवरुन होणार आहे. यामध्ये 23 फेऱ्या आहेत. यावेळी 160 अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

Share