सावली शाळेतील लसीकरण 100% यशस्वी
देवरी 24: तालुक्यातील जि प वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली येथे लसीकरण करण्याचे आयोजन करण्यात आले. लसीकरणामुळे कोरोना पासून बचाव होऊ शकतो याविषयी दीपक कापसे मुख्याध्यापक सावली यांनी गावात जागृती केली. तसेच गावात व्हाट्सअप द्वारे लसीकरणाविषयी जनतेच्या मनात लस न घेण्याविषयी भ्रामक कल्पना व संकाचे निरसन केले.सोबतीला पुरुषोत्तम जनबंधू, दीपक लांजेवार ,नंदकिशोर शेंडे, तुषार कोवाले, वर्षा वालदे यांनी इच्छुक लोकांची यादी तयार करून लसी करणासाठी प्रोत्साहित केले. मा. विजय बोरुडे तहसीलदार यांचे प्रेरणेने 40 डोस देण्यात आले ते शंभर टक्के यशस्वीपणे करण्यात आले.
लसीकरन केंद्राला डी बी. साकोरे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी देवरी, जगणे सर केंद्रप्रमुख डोंगरगाव ,डॉ. संतोष पेरणे डॉ. सुजाता ताराम सौ. साकुरे सिस्टर ,कु. झलके सिस्टर मीनाताई अंगणवाडी सेविका लसीकरणा वेळी उपस्थित राहून योग्य प्रकारे कोविड नियमाचे पालन करून लसीकरण उत्कृष्ट रित्या पार पाडले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंधरे ताई सरपंच , चंद्रसेन रहांगडाले , बिंझलेकर , रामेश्वर पवार शा.व्य. समिती अध्यक्ष श्कैलास भेलावे , शिवणकर ग्रामसेवक , सुनिल भेलावे ,अनिल भेलावे यांनी मोलाचे सहकार्य केले. पुढील लसीकरण याच प्रमाणे शंभर टक्के पार पडेल अशी आशा बाळगून जनतेच्या मनातील शंका ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समिती यांच्या सहकार्याने पार पाडू असे दीपक कापसे मुख्याध्यापक यांनी सांगितले उपस्थितांचे आभार मानले.