शाळेत बाहेरची शाळा उपक्रमां अंतर्गत सटवा शाळेची प्रांजल पटले आज आकाशवाणीवर
गोरेगाव- विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांच्या प्रेरणेने प्रादेशिक विद्या प्राधिकरण रविनगर, नागपूर, प्रथम एजुकेशन फाउंडेशन आणि जि. प. नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाळे बाहेरची शाळा या कार्यक्रमाचे प्रसारण नागपूर आकाशवाणीवरून होत आहे. या कार्यक्रमात उद्या 25 मे 2021 रोजी तालुक्यातील सटवा जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी प्रांजल महेंद्र पटले आकाशवाणीवर येणार आहे.
“शाळेबाहेरची शाळा”(भाग 147) हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे. संबंधित दोन्ही विभागातील यंत्रणेच्या मदतीने अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील अभ्यास पोहचविणे अपेक्षित आहे. आज दिलेल्या अभ्यासावर उद्या सकाळी 10:35 वा. आकाशवाणीच्या नागपूर ‘अ’ (५१२.८) केंद्रावरून प्रसारित केला जाणार आहे.
दर मंगळवार, गुरुवार व शनिवारला सकाळी 10.35 वाजता शाळा बाहेरची शाळा हा कार्यक्रम प्रसारित होतो. त्या अनुषंगाने उद्या 25 मे 2021 रोजी इयत्ता 6 वी ते 8 वी च्या मुलांसाठी कोरोना संदर्भात कोरोना होवू नये याकरिता तुम्ही काय काय करता, चर्चा करून सांगा या विषयावर आकाशवाणीवर मार्गदर्शन करण्याकरिता तालुक्यातील सटवा जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 7 वी ची प्रांजल महेंद्र पटले या विद्यार्थिनीची निवड झाली आहे.
सदर कार्यक्रमात प्रांजल च्या निवड झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी गोरेगाव, शाळेचे मुख्याध्यापक बीजेवार, सरपंच विनोद पारधी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर भगत, पोलीस पाटील टीकाराम रहांगडाले, सामाजिक कार्यकर्ते भागचंद्र रहांगडाले आदींनी अभिनंदन केले आहे.
‘प्रथम महाराष्ट्र’ या अँप च्या माध्यमातून मागील भाग ऐकण्यासाठी ‘शाळेबाहेरची शाळा’ हा टॅब निवडावा आणि थेट प्रसारण ऐकण्यासाठी ‘थेट रेडीओ प्रक्षेपण’ हा टॅब निवडावा. अँप वर सदरील कार्यक्रम नेहमी प्रमाणे सकाळी 10:30 वाजता प्रसारित होईल. अँप ची लिंक पुढील प्रमाणे https://play.google.com/store/apps/details?id=com.pratham.maharashtra