देवरी येथे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवस शेतकरी स्वाभिमान दिन म्हणून साजरा

?आमदार कोरोटे यांच्या भवनात कार्यक्रमाचे आयोजन

?या दिनानिमीत्य आमदार कोरोटे व तालुका कांग्रेस कमेटी तर्फे कोरोना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीत ११ हजार रू.जमा

देवरी,ता.०६:देवरी तालुका कांग्रेस कमेटी च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा वाढदिवस शनीवार (ता.०५जून) रोजी शेतकरी स्वाभीमान दिवस म्हणून मोठ्या थाटात व उत्साहात देवरी येथे आमदार कोरोटे यांच्या भवनात साजरा करण्यात आला. या दिना निमीत्य आमदार कोरोटे आणी तालुका कांग्रेस कमेटी तर्फे कोरोना महामारीत शासनाला आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री यांच्या मदत निधीत ११हजार रूपयाची देणगी देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमगाव- देवरी विधानसभेचे आमदार मा.सहसरामभाऊ कोरोटे हे होते. या प्रसंगी तालुका कांग्रेस अध्यक्ष संदिप भाटिया, जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्ष उषाताई शहारे,तालुका कांग्रेस के महासचीव बळीराम कोटवार,माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके,तालुका महिला अध्यक्ष सुभ्रदाताई अगडे,फुटानाचे नुतन बन्सोड,नरेश राऊत, प्रशांत कोटांगले, शार्दुल संगीडवार,कैलास देशमुख, सरपंच भारती सलामे,हरदोली चे सुभाष बारसे व श्री पटले यांच्या सह तालुक्यातील कांग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते.

Share