तेजस ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

देवरीः नुकतेच नागपूर येथे पार पडलेल्या विभागीय शालेय क्रीड़ा स्पर्धेत गोंदिया जिल्हातील देवरीच्या योगा स्पोर्ट्स अकादमीचे खेळाडूंनी उत्क्रुष्ट कामगिरी केली. या मध्ये 17 वर्षा खालील वयोगटात Traditional event मध्ये जिल्हा परीषद देवरी या शाळेतील तेजस विजय मते याने कोल्हापूर येथे होणार असलेल्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड पक्की करून देवरी तालुक्याचा नाव गौरव केला. याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिल,गोंदिया जिल्ह्या योग असोसिएशन अध्यक्ष विनायक अंजणकर सर तसेच योगा स्पोर्ट्स अकादमीचे मुख्य प्रशिक्षक रोहित ब्राम्हणकर, गणेश मुनीश्वर, प्रमोद कळमकर, स्वप्निल ठाकरे व अर्चना मारबते यांना दिले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share