जुनी पेन्शन साठी नागपूर विधिमंडळावर 25 डिसेम्बरपासून पेन्शन संकल्प यात्रेला होणार सुरुवात

◼️3 दिवस चालणार पेन्शन संकल्प यात्राबापू कुटीसेवाग्राम पासून होणार सुरुवात

◼️सेवाग्राम बुटीबोरी खापरी मार्गे पोहचणार विधानभवनावर

गोंदियाः जुनी पेन्शनचा मुद्दा संपुर्ण भारतभर ऐरणीवर आला असुन महाराष्ट्रसह संपुर्ण भारतातील कर्मचारी जुनी पेन्शन मिळावी म्हणुन आंदोलने करीत आहे. विधिमंडळात सुद्धा जुन्या पेन्शन च्या मुद्यावर साधक बाधक चर्चा सुरु आहे. येथील हिवाळी अधिवेशात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जुनी पेन्शन लागु केल्यास महाराष्ट्र राज्य आर्थिक संकटात येऊन महाराष्ट्रावर 1.10 लाख कोटीचा बोजा पडेल असे वक्तव्य केले. हे विधान कुठेतरी अतार्किक आहे.त्यांच्या ह्या वक्तव्यांमुळे संपुर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असुन उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त होत आहे. राज्यावर बोजा पडेल हे विधान चुकीचे असुन ते विधान कर्मचाऱ्यांचे व जनतेचे दिशाभुल करणारे आहे.

महाराष्ट्रात जुनी पेन्शन 1 नोव्हेंबर 2005 पासून बंद झाली. राजस्थान छत्तीसगड पंजाब झारखंड व हिमाचल प्रदेश या राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केली आहे. त्यांनी स्पष्ट करून सांगितले की NPS योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर जास्त भार येत आहे. NPS योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर भार पडत असून कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधकारमय होत आहे. NPS योजनेमुळे फक्त खाजगी कंपन्यांचेच चांगभलं होतांना दिसत आहे. आणि म्हणूनच तेथील सरकारने कर्मचाऱ्यांचे जीवन सुरक्षित व सन्मानपूर्ण व्हावं म्हणून OPS लागू केलेली आहे.सोबतच ज्याअर्थी आमदारांना जुनीच पेन्शन व कर्मचाऱ्यांना का नाही ? असा सवाल सुद्धा तेथील जुनी पेन्शन लागू करण्यात आलेल्या राज्यातील आमदारांनी विधानभवनात सवाल उपस्थित केलेला होता.

उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्या जुनी पेन्शन विरोधी धोरणामुळे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.त्यांच्या ह्या वक्तव्याचा निषेध व जुनी पेन्शन च्या मागणी करण्यासाठी 25 डिसेम्बर पासून पदयात्रा सुरु होणार आहे.27 डिसेंबर रोजी संकल्प यात्रा नागपुर येथील विधानभवनांवर धडकणार आहे. पेन्शन संकल्प यात्रेला महाराष्ट्रातील लाखो कर्मचारी सामील होणार आहेत. तरी नागपुर येथे गोंदिया जिल्ह्यातील NPS धारक व OPS धारक सर्व कर्मचाऱ्यांनी पेंशन संकल्प यात्रेत सामील व्हावे असे आवाहन संघटनेचे संदीप सोमवंशी , जयेश लिल्हारे, निराशा शंभरकर, प्रदीप राठोड सचिन राठोड प्रवीण सरगर जितू गणवीर हितेश रहांगडाले चंदू दुर्गे सदाशिव पाटील मुकेश रहांगडाले सुभाष सोनवाने महेंद्र चव्हाण रोशन गराडे विलास लंजे सचिन शेळके जीवन म्हशाखेत्री मनीष भलभद्रे संतोष रहांगडाले समीर तिडके,मुकेश टेंभरे,धर्मेंद्र पारधी,हस्तरेखा बोरकर,भूपेंद्र शनवारे,राकेश डोंगरे,गिरीश कुडेगावे आदी पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सर्व विभागाच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या लहान बंधू – भगिनींच्या हक्कासाठी तसेच NPS धारक कर्मचाऱ्यांनी विधानभवनावर आयोजित पेन्शन संकल्प यात्रेत सहभागी व्हावे व आपल्या हक्काच्या संविधानिक मागणीला बळ द्यावे.

राजेंद्रकुमार कडव
गोंदिया जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
Print Friendly, PDF & Email
Share