कायमस्वरूपी मुख्याधिकारी अभावी देवरीच्या विकासाला ग्रहण

देवरी: येथील नगरपंचायतीत कायमस्वरुपी मुख्याधिकारी नाहीत, याशिवाय अनेक महत्वची पदे रिक्त असल्याने अनेक कल्याणकारी योजना व शहराचा विकास ठप्प झाला आहे. कोणी मुख्याधिकारी देता का? असे म्हणण्याची वेळ पदाधिकारी, नगरवासीयांवर आली आहे. येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी देऊन रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी नपं पदाधिकारी व नागरवासीयांनी केली आहे.

माझी वसुंधरा अभियानात नाव लवकीक केलेल्या देवरी नगरपंचायतीत अनेक महिन्यांपासून मुख्याधिकारी नाहीत. परिणामी नगरपंचायतीच्या कामकाजावर परिणाम होत आहे.  नगरपंचायतीत मुख्याधिकार्‍यांसह अभियंता, पाणीपुरवठा अभियंता, लेखापाल, लेखापरीक्षक, गट क, श्रेणी ब, नगररचना सहायक अभियंता, कर निरीक्षक, सहायक कर निरीक्षक आदी पदे प्रतिनियुक्तीवर आहेत. नियमित अधिकारी, कर्मचारी नसल्याने नागरिकांची कामे रखडून असतात. कल्याणकारी योजनांची वेळीत अमलबजावणी होत नाही, विकास कामांत अडचणी येतात.

विकास कामांचा आराखडा वेळेत तयार न होणे, बिले अदा न होणे, पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, वैयक्तिक शौचालय प्रकरणे, बांधकाम परवाने, नवीन जागेच्या नोंदी, पाणी पुरवाठा योजना, विद्युत संदर्भातील कामे, प्रभागातील कामे खोळंबली आहेत.  नगरविकास विभाग व जिल्हाधिकारी यांना रिक्त पदांसदर्भात पत्रव्यवहार करूनही कायमस्वरुपी तोडगा निघाला नाही. वरील पदांवर तत्काळ कायमस्वरूपी नियुक्ती होणे गरजेचे आहे. रिक्त पदे न भरल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा नगरपंचायत पदाधिकारी, नगरवासीयांनी दिला आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें