चिचगड : मुंबई शहरात २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने चिचगड पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार जनार्दन हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली २६ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात डॉ. हेडगेवार रक्तकेंद्र, रामनगर, नागपूर यांच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाला पोलीस अधिकारी व अंमलदारांसह परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात एकूण ९० पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
रक्तदानाच्या माध्यमातून शहीदांच्या स्मृतींना मानवंदना देतानाच गरजू रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस उपनिरीक्षक मल्लिकार्जुन वासुदेव, महिला पोलीस उपनिरीक्षक जयश्री गव्हाणे, पोलीस उपनिरीक्षक नेताम, पोलीस निरीक्षक राऊत, सहाय्यक फौजदार कनपुरिया, पोलीस हवालदार राधेश्याम गाते, बाळकृष्ण राऊत, सोहन कोरेटी, नितीन शिरपूरकर, संजीव गावळ, पोलीस शिपाई संदीप तांदळे तसेच चिचगड पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी आणि पोलीस पाटील यांचे सहकार्य लाभले.








